तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री तुळजाभवानी मातेचे गोंधळी सम्राट राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड (गोंधळी) यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व संस्कृती विभागाच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. सुधीर निकम यांनी केली आहे. राजेंद्र गायकवाड (गोंधळी) यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंतचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. सदरील नियुक्तीचे पत्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपले कार्य व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास नूतन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
