तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी अधिक मासाच्या पाहिल्या दिनी श्री देवी भक्तांनी राजमाता जिजाऊ महाद्वार बाहेर उभाराहुनच श्री देवीची यथा सांग पुजा करुन कळस दर्शन घेतले. 

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या १७ मार्च पासुन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात श्री देवी भक्तांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सहा माहिने झाले तरीही भक्तांना मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. श्री तुळजाभवानी मातेवर भक्तांची अपार श्रद्धा असल्यामुळे मंदीरात भक्तांना प्रवेश बंद करण्यात आला असली तरी बाहेरून श्रद्धैपोटी कळस दर्शन घेतल्यामुळे मनाला शांती व एक उर्जा प्राप्त होते, असे भाविकामधुन प्रतिक्रिया येत आहेत.

तीन वर्षातुन एकदा येणाऱ्या अधिक मासात कुल धर्म कुलाचार करण्याची परंपरा असल्यामुळे शुक्रवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भक्तांनी महाद्वार बाहेर दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या काही माहिन्यात संसर्गजन्य कोरोनामुळे वाहतुक सेवा बंद होती. त्यामुळे वाहतुक सुरु होताच आपल्या स्वताच्या चार चाकी वाहनाने तसेच एसटी बसने प्रवास करुन भाविक श्री देवीच्या दरबारात बाहेरुन माथा टेकवून जात आहे.

श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर सामाजिक अंतर पाळुन योग्य त्या उपाययोजना करुन उघडावे, अशी  मागणी भाविकामधुन केली जात आहे. सध्या तुळजापुरात संसर्गजन्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले आहेत कि, शहराच्या बाहेर चेकपोस्ट वरती तपासुनच तिर्थ क्षेञ तुळजापुरात भाविकांना सोडण्यात यावे. पण याची अंमलबजावणी संबंधित प्रशासन करणार का? असाल सवालही उपस्थित केला जात आहे.

 
Top