उस्मानाबाद, दि. 11 : भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाधिकारकारणी मध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. दिपक आलुरे, इंद्रजित देवकते, विक्रम देशमुख. राहुल पाटील सास्तुरकर, सुखदेव टोंपे, सुरेश कवडे, प्रा. दिलीप पाटील, महादेव आखाडे, जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप शिंदे, माधव पवार आदम शेख, ॲड. नितीन भोसले, जिल्हा चिटणीस पदी वसंत वडगावे, सुहास साळुंके, गुलचंद व्यवहारे, अॅड. गणेश खरसडे, सुखबाई पवार, विक्रांत संगशेट्टी, सुनील काकडे, ज्योत्सना लोमटे, आशाताई लांडगे, हेमा चांदणे कोषाध्यक्षपदी नागेश नाईक, प्रसिध्दी प्रमुख साहेबराव घुगे, विनायक कुलकर्णी, युवा मोर्चा राजसिंहा राजेनिंबाळकर, महिला मोर्चा पदी माधुरी गरड, किसान मोर्चा संजय पाटील, ओबीसी मोर्चा विजय शिंगाडे, एस.सी. मोर्चा प्रवीण सिरसाठे, अल्पसंख्याक मोर्चा निहाल काझी, एस टी मोर्चा आदेश कोळी, विधी आघाडी अॅड. संतोष सुर्यवंशी, अॅड. प्रतिक देवळे, बुध्दिजीवी आघाडी पांडुरंग पवार, तसेच व्यावसायीक आघाडीच्या संयोजकपदी सुशांत भुमकर, सहसंयोजक प्रवीण पाठक, बालाजी पवार, डॉक्टर सेल आघाडीच्या संयोजकपदी डॉ. मनोज घोगरे, डॉ. अंकुश पाटील, सहकार आघाडी उमेश कुलकर्णी, नारायण नन्नवरे, पुर्व सैनिक आघाडी महावीर तनपुरे, सोशल मिडीया प्रशांत मोहिते, विक्रम वीर, व्यापार आघाडी श्रीकांत मिणीयार, भटके विमुक्त आघाडीपदी सिताराम वनवे यांची निवड करण्यात आली आहे.


 
Top