उस्मानाबाद, दि. 11 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उस्मानाबादच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. दरम्यान, यावेळी कुलुगरुंना विद्यार्थ्यांच्या समस्या सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, चालु वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात तीस टक्के कपात करावी, उस्मानाबाद येथील उपकेंद्र हे लवकरात लवकर स्वतंत्र विद्यापीठ करावे, मागील सत्रातील १५ मार्च पासून घेतलेली लायब्ररी फी, जीमखाना फी, प्रयोगशाळा फी, हॉस्टेल फी यासह इतर फी ही लवकरात लवकर परत करावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर येथे तात्काळ तक्रार निवारण केंद्र उभे करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी गुरुवारी अखिल भारतीय विदयार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी कुलगुरूनी अभाविपच्या शिष्टमंडळाला मागील शैक्षणिक वर्षाचे परीक्षा शुल्क परत करण्यासह चालू शैक्षणिक वर्ष शुल्कात तीस टक्के कपात करण्यासाठी विद्यापीठाने एक समिती गठित केली असून एक महिन्यात विद्यार्थ्यांना हे शुल्क परत करण्यात येइल असे आश्वासन दिले.