तुळजापूर, दि. 11 : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाबोराम महाराज यांच्या पवित्र नावाने सुरू केलेले संत तुकाराम बिडी व छत्रपती संभाजी महाराज विडी हे उत्पादन तात्काळ बंद करण्याची मागणी  महाराष्ट्र वारकरी महामंडळ तुळजापूरच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाची अस्मिता, महाराष्ट्राचे आराध्यस्थान असणारे जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाचे बिडी उत्पादन करण्याचे नीच कृत्य निजामाबाद येथील उत्पादकांनी केले आहे. संत तुकाराम महाराजांच्या नावाने हे उत्पादन काढून सदर उत्पादकाने संपूर्ण वारकरीच नव्हे तर जनसामान्यांच्या भावानांचा घोर अपमान केला आहे. तरी या उत्पादन निर्मितीस बंदी आणून आजवर वितरीत केलेल्या संपूर्ण उत्पादनाचा माल ताब्यात घ्यावा, तसेच युगपुरुषांच्या अवमान प्रकरणी सदर उत्पादकावर कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वारकरी महामंडळाने दिला आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे ह.भ.प. बापुराव घंदुरे महाराज, ह.भ.प. दिपक महाराज निकम, ह.भ.प. शिवाजी महाराज भोजने आदींच्या स्वाक्ष-या आहेत. 


 
Top