वागदरी : एस.के. गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील युवा कार्यकर्ते भारतसिंग विजयसिंग ठाकूर यानी कोरोना वर मात करुन गावात प्रवेश करताच जंगी स्वागत करून भव्य सत्कार करून कोरोना मुळे मानवी साखळी तोडणे आवश्यक असले तरी मानवतेची साखळी ठिकवणे अत्यावश्यक आहे, असा संदेश दिला.

वागदरी ता.तुळजापूर येथील युवा कार्यकर्ते भारतसिंग ठाकूर गेल्या वीस दिवसापूर्वी दि.२८सप्टेंबर२०२० रोजी स्वतःला अस्वस्थता जाणवत असल्याने उपचारासाठी सोलापूर येते एका खाजगी दवाखान्यात गेले असता  तिथे त्यांची कोव्हिड१९ टेस्ट केली असता ते पाँजिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा त्यांच्यावर संबंधित डॉक्टरने तातडीने उपचार सुरु केला. कोरोना अटोक्यात येतो न येतो तेवढ्यात निमोनियाने त्याना घेरलेआणि त्यांची खरी म्रुत्युसी झुंज सुरू झाली. करारी बाणा असलेले भरतसिंग ठाकूर हार मानणार कसे. त्यांनी उपचाराला प्रतिसाद देत  कोरोनासह निमोनियावर मात केली आणि कोरोना मुक्त झाले. दि.१३सप्टेंबर रोजी दवाखान्यातून डिसचार्ज घेऊन सायंकाळी ७.३० वागदरी गावात प्रवेश करताना ग्रामस्थासह मित्रपरिवारानी फटाक्यांची अतिषबाजी करून हालगी वाजवत सामाजिक अंतर ठेवून जंगी स्वागत करून शाल,फेटा,पुष्पहार देवून सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमोद बिराजदार,योगेश सुरवसे, दत्ता पाटील, रवी ठाकूर, किशोर यादव,लक्ष्मण झेंडारे  सह कार्यकर्ते उपस्थितीत होते. भारतसिंग ठाकूर कोरोना मुक्त झाल्याने वागदरी गाव पूर्ववत कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थातून समाधन व्यक्त केले जाते आहे.


 
Top