अचलेर : जय गायकवाड

उमरगा तालुक्यातील येळी येथील सुरवसे कुटुंबात जन्मलेल्या कु. मंजुळा माधवराव सुरवसे, पुजा सुरवसे (धाडवे), कू. डॉ. आरती पांडुरंग सुरवसे, करुणा सुरवसे (वाघमारे) या सर्व बहिणी आपल्या जीवाची पर्वा न करता जगावर आलेल्या कोरोना या रोगाच्या नियंत्रणासाठी अविरत रुग्णसेवा बजावत आहेत.

कुमारी मंजुळा ही गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई येथील के.ई.एम.हॉस्पिटल ज्याठिकाणी कोविड चे शंभर टक्के रुग्ण आहेत अश्या ठिकाणी ती रात्रंदिवस सेवा बजावत आहे. तर पूजा ही नायर हॉस्पिटल मुंबई येथे, तर करुणा सुरवसे (वाघमारे) ही पुणे येथील महात्मा फुले आरोग्य योजनेच्या खाजगी दवाखान्यात असून राखी सुरवसे(सुतके) सांगवी पुणे येथे नर्स म्हणून कार्य करीत आहे व आरती सुरवसे (मुंबई) येथे वैद्यकिय सेवेतून लढत आहे. समाजामध्ये स्त्रिया या सुध्दा पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. हे या सुरवसे भगिनींनी दाखवून दिले आहे.

स्त्रीभ्रूणहत्या करून मुलगी काय कामाची आहे अस म्हणणाऱ्या आखूड बुद्धीच्या लोकांसाठी हा उत्तम दाखला आहे. यांची मोठी बहीण सौ. कांचन सुरवसे (कांबळे) या सुध्दा अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल मध्ये सहशिक्षक पदी कार्यरत आहेत. 

या सर्व बहिणींचे व त्यांना सुसंस्कार देणाऱ्या आई वडील गुरुजनांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top