अचलेर : जय गायकवाड 

ऑडिओ बूक्स हा महाराष्ट्रातील विविध भागातील एकत्र आलेल्या कवी, गायक व इतर क्षेत्रातील नोकरदार मित्रांचा ग्रूप आहे. या ग्रुप च्या माध्यमातून विविध महत्वाच्या विषयावर ऑडिओ क्लिप तयार करून त्या वाचकापर्यंत पोहचल्या जाव्यात आणि वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा हाच यातील सर्व सदस्यांचा शुद्ध हेतू आहे. त्याचबरोबर इतर शारीरिक कारणामुळे ज्यांच्यासाठी वाचन शक्य नाही किंवा अतिशय कठीण आहे,ज्यांना वाचनाची आवड आहे पण पुस्तके विकत घेणे वा ग्रंथालयाची वर्गणी भरणे शक्य नाही किंवा पुस्तके उपलब्ध होत नाहीत, ज्यांना वेळेअभावी वाचन करणे शक्य नाही त्यांना या ग्रुप च्या माध्यमातून तयार केलेल्या ऑडिओ स्वरूपातील पुस्तकांचा, लेखांचा नक्कीच फायदा होईल. 

यांच्याच वतीने ऑडिओ सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ११२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये परीक्षकांच्या निर्णयानुसार विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली व त्यांना या ग्रुप च्या वतीने कौतुकाची थाप पडावी म्हणून बक्षीस वितरण करण्यात आले.

यामध्ये गद्य विभागातून प्रथम नागेश पद्यन, द्वितीय उत्तम सदाकाळ व दिपाली दत्तात्रय कात्रे, तृतीय निता जयवंत, उत्तेजनार्थ लीना भुसारी-खैरकर व इला वागदरीकर-मराठे, तर काव्य विभागातून प्रथम जुई अजय देशमुख, द्वितीय परमेश्वर रोकडे, तृतीय सुनीता ओक, उत्तेजनार्थ अर्चना इंद्रजित कोकाटे व इला वागदरीकर-मराठे या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून सतिश नवले, पुंडलिक पिंपळके, ज्ञानेश्वर बुधवंत, आनंद शिंदे, दूशांत निमकर यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्ना हिले, शितल खरे-जोशी, विना रणदिवे, अपर्णा बन्नगरे, मुकेश बनसोडे, चेट्टीयार, रवींद्र कानिटकर, प्रिती टेकाळे, फारुक जमादार, संकेत मुनोत,  सागर कुंभार, समिधा गांधी, लक्ष्मण गोळे, असिफ शेख, पूजा मोरे, सकिना वागदरीकर, गणेश भंडारी यांनी पुढाकार घेतला.

 
Top