उमरगा, दि. 17 : अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाच्या उमरगा तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी अचलबेट देवस्थानचे निष्ठावंत सेवाधारी ह.भ.प. पत्रकार लक्ष्मण पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ह.भ.प. प्रदीप महाराज मोरे अखिल भाविक वारकरी मंडळाचे उमरगा तालुका युवा अध्यक्षतेखाली अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष ह-भ-प महादेव महाराज सस्ते यांनी निवड जाहीर केली. यावेळी ह-भ-प बळीराम महाराज जांभळे, ह-भ-प ज्योतीराम चांगभले, हभप मोहन महाराज शेळके, ह.भ.प दयानंद महाराज बनसोडे व उमरगा तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील मान्यवर महाराज अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. भिम महाराज, ह.भ.प. हरी लवटे महाराज, बंडू गुरूजी नेलवाडे, संजय राठोड महाराज, ज्ञानेश्वर माशाळकर, ईश्वर माळी महाराज, कृष्णा महाराज, राजू माळी महाराज, प्रदिप मोरे महाराज, दामू बिराजदार, करण कुन्हाळे, पंडीत मुळे साहेब, मगर अण्णा बिराजदार, जनार्दन भोसले, नरसिंग लवटे, बबर माने, बाळासाहेब जांभळदारे, सचिन जाधव, धोंडीराम मुगळे, मनिष सोनी, हरी नरवने, निळकंठ जमादार, दामू मुगळे, गजेंद्र मुगळे सर, कदमापूरचे आशुतोष महाराज, अमरबेटचे दिपक महाराज आदी मान्यवरांनी पञकार लक्ष्मण पवार यांचे अभिनंदन केले आहेत.
