काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सदन शेतकरी दादाराव राजाराम रोडे वय (65) यांचे शुक्रवार दि.4 दुपारी चार वाजता शेतात मशागत करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

       त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 5 रोजी सकाळी नऊ वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top