अणदूर : येथील दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिवरी येथील दत्तू आण्णा पाटील विद्यालयातील शिक्षकांचा मास्क, श्यानिटायझर ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पत्रकार दयानंद काळुंके म्हणाले की, दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्था गेली अनेक दिवस शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव सामाजिक कार्य करीत असून कोविड संकटात शिक्षकांना आरोग्य सांभाळण्यासाठी N95 मास्क व श्यानिटायझर देऊन त्यांना गौरवणे ही महत्त्वाची गोष्ट संस्थेने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून केली आहे.

या विद्यालयातील 14 शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती बिराजदार लक्ष्मी, शिंदे एस एम , एस बि, कांबळे सि डी, मस्के एस ए, सूर्यवंशी के एस, ठाकूर के पी, शिंदे बी बी,श्रीमती ढगे एस बी, गंगणे एस बी, गायकवाड बी ए, साळुंके ए पी, घोडके पी एल,  फुलसुंदर ए .स . आदी शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला, सदरील कार्यक्रम कोरोना नियम अटी पाळून ,सोशल डिस्टन्स राखून घेण्यात आला.          

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय अणदूरकर,चंद्रकांत गुड्डू, सचिन तोग्गी, सुभाष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top