उस्मानाबाद : महेश पाटील

तालुक्यातील बेंबळी येथे शिक्षक दिनाच्या औचित्य साधून गावातील युवकांच्या वतीने शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय. त्यातच कोरोना संसर्गजन्य आजाराचा पार्श्वभूमिवर कोरोना सहाय्यता कक्षात कर्तव्यदक्ष कामगिरी व कोरोना आजारामुळे शैक्षणिक वर्ष पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान न होऊ देतात त्यांना व्हिडिओ काॅन्फरन्स च्या माध्यमातून तसेच वाॅटसअप वर्गनिहाय ग्रुप तयार करून अध्यापनाचे ज्ञानदानाचे परिपूर्ण प्रयत्न शिक्षक करत आहेत.

 शिक्षक दिनाचे औचित्य साधून बेंबळीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवक आकाश पाटील, अजित खापरे-पाटील,आकाश शिडूळे यांनी बेंबळीतील जिल्हा परिषद शाळा,जिजामाता कन्या प्रशाला,सरस्वती माध्यमिक शाळा,छञपती संभाजी महाविद्यालय,प्रभाकर बोंदर इंग्लिश स्कूल तसेच गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा पुप्षगुच्छ व आर्सेनिक अलबम गोळया वाटप करून त्यांचा सन्मान केला...

आदर्श पिढी घडवणा-या शिक्षकांचा सन्मान करने हे एक आद्य कर्तव्य आहे तसेच गुणवत्तेसाठी वाढावी यासाठी खूप परिश्रम ही घेतात तसेच कोरोना च्या पार्श्वभूमिवर खूप परिश्रम घेतले त्या प्रति त्यांचा कृतज्ञता व सन्मान करावा या उद्देशाने पुष्प देऊन सन्मान करण्याचा हेतू असल्याचे येथील युवक आकाश पाटील यांनी बोलताना सांगितले.


 
Top