उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा तालुक्यातील मुळज येथील शेतकरी बाळासाहेब चंद्रकांत जाबळदारे यांचा 2 एकर ऊस रविवार दि. २० रोजी दुपारी पडलेल्या पावसाने संपूर्ण आडवा पडला आहे.

मुळज व परिसरात गेल्या दोन आठवडयापासून पावसाने थैमान घालत हाहाकार माजवला असताना बघेल तिकडे पाणीच पाणी असे चिञ दिसत आहे.

मुळजचा शेतकरी बाळासाहेब जांभळदारे यांचा दोन एकर ऊस असून व्याजाने पैसे काढून ऊस लागवड केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा काढणीला आलेला उभा ऊस जमीनदोस्त झालेला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करीत आर्थिक नुकसानभरपाई मिळवून दयावे अशी मागणी होत आहे.

 
Top