तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ कोळी यांची तर उपाध्यक्षपदी कुमार कोळी यांची निवड करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटना दिल्ली यांची उस्मानाबाद येथे कोळी समाजाच्या विविध मागण्यासाठी तसेच नूतन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बैठक पार पडली. या बैठकीत उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी सोमनाथ कोळी तर उस्मानाबाद उपजिल्हाध्यक्ष पदी कुमार कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र संजीव शिरसाट यांनी जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोळी व उपजिल्हाध्यक्ष कुमार कोळी यांची नियुक्ती केली आहे. 

जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोळी यांची नियुक्ती झाल्यामुळे कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्या आहेत ते पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सोमनाथ कोळी जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

 
Top