नळदुर्ग, दि. 24 : होर्टी ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस अणदुर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश राठोड यांनी भेट दिली. शाळेच्या सुट्टी कालावधीतील शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले. दरम्यान, यावेळी राठोड यांनी शाळेतील झाडे पाहून समाधान व्यक्त केले.
होर्टी येथील ग्रामस्थ व शाळेतील शिक्षकांनी मिळुन शाळा वनराई करण्याचा संकल्प केला आहे. मियावाकी 1254 व इतर 254 झाडे जिवंत आहेत. खूप सुंदर नियोजन करून शाळेत वनराई फुलवली गेली आहे. याबाबत त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक अरुण अंगुले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. होर्टी येथील शाळा ही गुणवत्ता विकासात प्रगतीपथावरील शाळा असून नेहमी शाळेत अनेक व सुंदर उपक्रम घेण्यात येतात त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः राठोड हे होर्टी शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत होते. होर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले आहे.
यावेळी मुख्याध्यापक अरुण अंगुले, पदवीधर शिक्षक बसवराज माशाळकर, सहशिक्षक व्यंकट कोळी, नितीन रामनबैनवाड, विजयकुमार चव्हाण, विजयकुमार कदम, मारुती कोरे, हरिभाऊ कळबंडे, बालाजी माळी, बाबुराव चव्हाण, सरपंच संजय गुंजिटे, उपसरपंच अशोक राजमाने, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, उपाध्यक्ष संतोष कणसे, शिक्षक तज्ञ धुराप्पा वाघमारे आदीजण उपस्थित होते.
