तुळजापूर : श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे सचिव तथा नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. काकासाहेब शंकरराव शिंदे, वय 70 यांचे मंगळवार दि. 8 रोजी पहाटे 4.30 वा हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले ऐक मुलगी तीन भाऊ दोन बहीणी असा परिवार आहे. कै प्रा काकासाहेब शिंदे यांच्या वर मगंळवारी सकाळी सोशल डिस्टंन्स पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रा.काकासाहेब शिंदे हे तुळजापुर शहरातील आदर्श व्यक्तीत्मव होते क्रिडा क्षेत्रात व इतर क्षेत्रांत ही त्यांनी उंच भरारी घेतली होती त्यांच्या अचानक जाण्याने समस्त पाळीकर पुजारी बाधंवावर व तुळजापुर शहरावर शोककळा पसरली होती.