जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाटील तांडा येथील चार कोरोना रुग्ण झालेल्या रुग्णावर ग्रामस्थाने पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
खुदावाडी व पाटील तांडा येथे कोरोनाचा शिरकाव झाला होता. पाटील तांडा येथे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. सदर चार रुग्ण हे तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन यशस्वी मात करून घरी आले आहेत. त्यांच्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्यातील व राज्यातील वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर्स परिचारिका यांचा ग्रामस्थानी आभार मानले.
यावेळी माजी सरपंच गुरुनाथ कबाडे, रेवणप्पा स्वामी, शरणाप्पा कबाडे, शिवपुत्र कबाडे, ग्रा.पं. सदस्य सावंत, पवार, देवाप्पा खजुरे, पोलीस पाटील बसवेश्वर सांगवे, दिगंबर कबाडे, चंदु कापसे, संजय राठोड, पत्रकार सतिश राठोड, शंकर राठोड, भालचंद्र राठोड, विलास पवार सह ग्रामस्थ उपस्थित होते. एकंदरीत खुदावाडी हे गाव कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.