मुरुम, दि. १२ :
मुरूम येथील पत्रकार महेश निंबरगे यांची भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या उमरगा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी निंबरगे यांची नियुक्ती केली आहेत.
गेल्या अनेक 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आणि बसवेश्वर युवक मंडळ तसेच शिवशांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. त्यांचे भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.