नळदुर्ग, दि. 12 : महावितरणने शहरात उभे केलेले विजेचे पोल तात्काळ सीमेंट कॉन्क्रीटने मजबूत करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयासमोर टाळे ठोका आंदोलन करण्यात येणार आहे.
नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या वतीने उभे करण्यात आलेले विजेचे पोल सिमेंट कॉन्क्रीट करून हे सर्व पोल मजबूत करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार निवेदन दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महावितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दि. ५ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या थाळी नाद आंदोलन करूनही दिलेल्या आठ दिवसाच्या मुदती नंतर निवेदनावरील इशा-याप्रमाणे सोमवारी टाळे ठोका आंदोलन करण्यात येणार असल्याचे महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांची स्वाक्षरी आहे