तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील जळकोटवाडी येथील गेली अनेक वर्षापासून वाकलेले विजेचे खांब खा.ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाने सरळ करून गावातील वीजपुरवठा सुरळीत चालु झाल्याने सरपंच व ग्रामस्थांनी खा.ओमराजे निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
जळकोटवाडी येथील गावास वीजपुरवठा करणारे विजेचे खांब हे गेली ३५ वर्षापासुन वाकले होते.यामुळे गावातील नागरीकांना वाकलेल्या खांबापासुन धोका निर्माण झाला होता तसेच गावातील विजेचा प्रश्नही गंभीर बनला होता.गाव कारभार्यांनी अनेकवेळा महावितरण तसेच प्रशासनास सांगुनही वाकलेले विजेचे खांब सरळ होत नव्हते.तब्बल ३५ वर्षानंतर सरपंच गणेश डोलारे यानी हे काम करण्याचे ठरवले व त्यांनी लागलीच खा.ओमराजे निंबाळकर यांना दुरध्वनीवरून याबाबत व इतर कामाबात माहीती दिली.खा.ओमराजे यांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क करून तात्काळ काम करण्यास सांगितले. ३५ वर्षापासुन रखडलेले काम खा.ओमराजे यांच्या प्रयत्नाने केवळ दोन दिवसात पुर्ण करत वाकलेले विजेचे खांब सरळ करून नविन विजवाहक तारासह नविन सिंगल फेस विद्युत रोहीत्र बसवुन विजेचे संपुर्ण काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सरपंच डोलारे यानी सांगितले .सरपंच गणेश डोलारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खा.ओमराजे निंबाळकर यांनी अनेक वर्षापासून रखडलेले काम पुर्ण केल्याने सरपंच व ग्रामस्थांनी खा. ओमराजे निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
या कामी तांत्रिक अधिकारी कावरे,वायरमन रूपेश,उपसरपंच राजेंद्र देशमुख यांचे तसेच ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सरपंच गणेश डोलारे यानी बोलताना सांगितले.
