काळेगाव : प्रकाश साखरे

तुळजापुर तालुक्यातील काळेगाव व परिसरात रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे  सोयाबीन पिकासह ऊस, कांदा, वांगी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

सुरूवातीला पाऊस नसल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसत आहे.


 
Top