नळदुर्ग, दि. 08 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नळदुर्ग नगरपालिकेसमोर मंगळवार दि. 8 रोजी विविध मागण्यासाठी होणारे लाक्षणिक समोर मागे घेण्यात आले आहे.
मनसेच्यावतीने दि. ८ रोजी नगर पालिके समोर विविध मागण्यासाठी होणारे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनामुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध संघटना पाठिंबा देऊन गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाला सहकार्य म्हणून उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष अलीम शेख यांनी सांगितले आहे.