नळदुर्ग, दि. 07 : शहरातील अंतर्गत विविध रस्ते तात्काळ करावे, त्याचबरोबर होत असलेली काम दर्जाहीन होत असल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नळदुर्ग नगरपालिका कार्यालयासमोर मंगळवार दि. 8 सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

चौदाव्या वित्त आयोगातुन नळदुर्ग नगरपालिकेमध्ये होत असलेल्या फर्नीचरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्याची क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडून तपासणी करावी, तसेच शहरातील डि एड कॉलेज रोड, रहीम नगरचा रस्ता कित्येक वर्ष झाले होत नाही. त्याचबरोबर शहरातील बसस्थानक ते किल्ला गेट हा मुख्य रस्ता दुभाजक पद्धत, सुशोभित करून चांगल्या दर्जाचा करावा, तसेच शास्त्री चौक ते हायवे लगत असलेला रस्ता कित्येक वर्ष खड्याच्या अवस्थेत आहे, हा रस्ता तात्काळ करावा व त्याच बरोबर शास्त्री चौक - नानिमा दर्गाह रोड हा हायवे रोडपर्यंत जोडणारा रस्ता तात्काळ करावा, आदी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी पालिकेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकड़े देण्यात आले.

निवेदनावर  मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जनहित कक्ष व विधी विभाग ता. अध्यक्ष अॅड. मतीन बाड़ेवाले,शहराध्यक्ष अलिम शेख,सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top