हन्नुर : नागराज गाढवे 

 अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील श्री मल्लिकार्जून प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमाकांत गाढवे होते . प्रथम डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उमाकांत गाढवे व श्रीशैल स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी उमाकांत गाढवे यांनी शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत लेखक तत्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजीनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते असे म्हणाले .तसेच याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिध्द रोडगीकर सर यांनी माजी भारताचे राष्ट्रपती डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली . यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
Top