नळदुर्ग, दि. 13 : शहरात होत असलेल्या महामार्गावर दुभाजकात पथदिवे बसविणे, हायमास्ट लैम्प, रिफ्लेक्टर साईन बोर्ड, आवश्यक तेथे गतिरोधक व रंबलर स्ट्रीप करणे, सर्विसरोड व महामार्गावरिल सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा, वृक्षारोपण व हिरवळ निर्माण करावेत या प्रमुख मागण्यासाठी आज नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागण्याचे डिजिटल बॅनर लावण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग तूळजापुर-अक्कलकोट, सोलापुर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकड़े यापूर्वी मनसेने निवेदनाद्वारे मागणी केली होती. वाहन चालकाला कोणताही त्रास होउ नये म्हणून दुभाजकामध्ये पथदिवे बसवावेत व हिरवळ करून सुशोभित करावे. नळदुर्ग गोलाई चौक, बालाघाट महाविद्यालया समोरील चौक, रामलीला नगर समोरील चौक, नानिमा दर्गाह रोड चौक व बस स्थानक समोरिल प्रमुख चौकात हाइमास्ट लैंप उभे करावेत, बस स्थानकासमोर सर्कल करावे, तसेच आवश्यक तेथे गतिरोधक व रंबलर स्ट्रीप करावे, रिफ्लेक्टर साईन बोर्ड बसवावेत,व सर्विस रोड व महामार्ग करताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा, वृक्षारोपण, व हिरवळ निर्माण करावी आदि मागण्या करण्यात आल्याचे डिजिटल बॅनर लावण्यात आले आहे.