नळदुर्ग, दि. 13 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून शहरात महावितरणच्यावतीने उभे करण्यात आलेल्या पोला सिमेंट कॉन्क्रीट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शहरात महावितरणच्या वतीने विजेचे पोल उभे केले होते. ते उभे करीत असताना सीमेंट कॉन्क्रीट न करता तसेच उभे केले जात होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आक्षेप घेत वारंवार पाठपुरावा केला. तसेच दि. ५ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन केल्यानंतर महावितरण खड़बडून जागे झाले असून पोलला सीमेंट कॉन्क्रीट करन्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्या सोमवार रोजी होणारे टाळे ठोका आंदोलन मागे घेतल्याचे मनसेच्या पदाधिका-यानी सांगितले आहे. उर्वरित सर्व पोल सीमेन्ट कॉन्क्रीट करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधितांना लेखी पत्र दिले आहे.