परंडा, दि. 13 : जुगार अड्डयावर जुगाराचा खेळ रंगला असतानाच पोलीसांनी अचानक धाड मारुन जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असे मिळून सुमारे 1 लाख 63 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी 11 जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. जुगार खेळणारे सर्वजण बाशी जि. सोलापूर येथील रहिवाशी आहेत.

जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पोलीसांनी दि. 12 सप्टेंबर रोजी तालुक्यातील वारदवाडी फाटा परिसरात छापा मारला. यात मयुरी हॉटेलच्या बाजूस असलेल्या बाळासाहेब चौधरी यांच्या शेडमध्ये 1) मनोज कटारे 2) बालाजी इंगळे 3) गणेश डोंगळे 4) बाळासाहेब कदम 5) मुकेश भोरे 6) अतुल बागल 7) सचिन ढोले 8) सुरेश काळे 9) महेश पवार 10) हरी ढेरे 11) अमर विधाते, सर्व रा. बार्शी हे तिरट जुगार साहित्यासह रोख रक्कम, 5 मोबाईल फोन व 4 मोटारसायकल असा एकुण 1,63,070/-रु. च्या मालासह आढळले.


 
Top