तुळजापूर : कुमार नाईकवाडी

मराठा आरक्षण हे पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले असून नोकरी व शिक्षणाला सर्वोच्च स्थगिती देण्यात आली आहे. या निणर्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला स्पष्टपणे फसविल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरुवार दि. १० गुरुवार रोजी तुळजापूर येथील छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आले. तसेच यावेळी तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे व पाठपुरावा व्यवस्थित न केल्याने मराठा समाजावर ही वेळ आली आहे. तामिळनाडु, तेलगंणा ,आध्रंप्रदेश, राजस्थान आदी राज्याची आरक्षण सुनावणी गेली कित्येक वर्षापासुन प्रंलबित आहे तरी मराठा आरक्षणाचीच सुनावणी का ? आणि मराठा आरक्षणातील वकील का बदलले ? सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात करुन मराठा समाजाला फसविले आहे. याकरिता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सरकारने तात्काळ प्रयत्न करण्याची गरज असुन जर सरकारने वेळकाढूपणाचे धोरण आखत असेल तर मराठा समाज रस्त्यावर उतरुन जवाबदार लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंञी यांना तालुक्यात व जिल्ह्यात बंदी करावी लागेल व राज्यसरकाच्या विरोधात राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर मराठा समन्वय समितीचे सुनिल नागणे, सज्जनराव सांळुके, जिवन इंगळे, धैर्यशिल कापसे, शरद पवार, कुमार टोले, महेश गवळी, आण्णासाहेब क्षिरसागर, तुकाराम ढेरे, विशाल सावंत, प्रशांत अपराध, प्रशांत इंगळे, उमेश दळवी, विशाल सांळुके आदीसह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top