तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

राज्यातील लॉकडाऊन काळातील नागरीकांचे विज बील माफ करावे, अशा आशयाचे एक लेखी निवेदन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गुरुवार दि. १० रोजी आमदार सुजितसिंह ठाकुर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या नेतृत्वाखाली  तहसील मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तुळजापुर येथील महावितरण कंपनी यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे सर्वसामान्य जनतेचे लॉकडाऊन काळात गंभीर परस्थिती निर्माण झाली आहे. उदर निर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. केंद्र सरकार शक्य तेवढा कोणत्याही माध्यमातून संवेदनील राहुन नागरीकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे व सर्वसामान्य गरीबाच्या पाठीशी उभा आहे. माञ दुसरीकडे राज्य शासन असंवेदनशिलचा कळस गाठत आहे. या महामारीच्या जिवनात सामान्य नागरीकांची पिळवणूक करीत असल्याचे सांगुन पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारने राज्यातील संपुर्ण विज बील माफीचा निर्णय घेवुन सर्वसामान्य जनतेला अडचणीतुन बाहेर काढावे, लॉकडाऊन काळातील या राज्यसरकारने विज बील माफ करावे व याची अंमलबजावनी करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर भाजपा युवा  मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, सचिन रसाळ, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत सांळुके, राम चोपदार, नानासाहेब डोंगरे, प्रसाद पानपुडे, सागर पारडे, अभिजित लोके, सागर कदम, बाळकृष्ण रोडे, मनोज काचुळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top