तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मध्ये श्री तुळजा भवानी मातेस अर्पण करण्यात आलेल्या विविध वाहिक वस्तुचा दि.९ बुधवार रोजी येथील जुन्या प्रशासकीय कार्यालयात जाहीर लिलाव करण्यात आला.सदरचा लिलाव सरकारी बोलीप्रमाणे सुरु होऊन तीन बोली नतंर अंतिम करण्यात आला. या लिलावात एकुण ६ व्यापारी बोली धारकानी सहभाग घेतला होता. यातुन ७६ हजार रुपयाचे श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान यास उत्पन्न प्राप्त झाले.
श्री देविजीस अर्पण केलेल्या वाहिक वस्तु खालील प्रमाणे १)खोबरे ६५५ किलो,२)खारीक १९० किलो ३),हळकुंड २१० किलो ४),बदाम इत्यादी १८० किलो ५) सुपारी ११५ किलो इ.वस्तुचा श्री देवीजीस अर्पण केलेल्या वस्तुच्या रकमेतुन श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान यास भाविकांकडून अर्पण केलेल्या वाहिक वस्तु मधुन उत्पन्न मिळाले, अशी माहिती श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान च्या व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली.
या वेळी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे रोखपाल महेश आदमाने लिपीक विश्वास परमेश्वर कदम आदीसह बोलीधारक व्यापारी व मंदीर कर्मचारी उपस्थित होते.