मुरुम, दि. 22 : चारित्र्याच्या संशायावरुन पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप घाव घालून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथे आज मंगळवार दि. 22 सप्टेंबर रोजी पहाटेपूर्वी घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्योत्सना अर्जुन सुरवसे, वय 40 वर्षे, रा. चिंचोली (भुयार), ता. उमरगा या दि. 22.09.2020 रोजी रात्री घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान रात्री 01.00 ते 02.00 वा. च्या सुमारास पती- अर्जुन धोंडीबा सुरवसे याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी- ज्योत्सना यांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खुन केला. या खुनास ज्योत्सना यांची नणंद- विनंता व तीचा पती- विलास सुर्यवंशी, रा. मुरळी, ता. उमरगा यांनी प्रोत्साहन दिले आहे. अशा मजकुराच्या राम मनोहर कांबळे, रा. निलंगा (मयताचा भाऊ) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
