तुळजापूर, दि. 22 : रामेश्वर नागनाथ नन्नवरे, रा. माऊलीनगर, तुळजापूर यांच्या घरासमोरील हिरो हंक मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 1212 ही दि. 09.09.2020 रोजी मध्यरात्री चोरीस गेली होती. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 नुसार पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 318 / 2020 नोंदवला आहे.

गुन्हा तपासादरम्यान तुळजापूर तालूक्यातील ढेकरी येथे राहणारा अक्षय मारुती शिंदे उर्फ अखिल, वय 23 वर्षे हा चोरीची मोटारसायकल वापरत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरशेवाड यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 22.09.2020 रोजी नमूद आरोपीस वरील चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. तुळजापूर च्या ताब्यात दिले आहे.  

 
Top