नळदुर्ग, दि. 20 : "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिमेंतर्गत  वडाचा तांडा ता. तुळजापूर येथील नियुक्त केलेल्या आशा कार्यकर्ती व दोन स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वेक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांची नोंदणी करून त्यांचे शारीरिक तापमान आणि शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण तपासले जात आहे.

वडाचा तांडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कडक पाऊले उचलीत जात असल्याने अद्याप एकही कोरोना रुग्ण गावात आढळलेला नाही.  या मोहिमेंतर्गत दररोज दररोज 50 कुटुंब तपासली जाणार आहेत. एकूण 200 कुटुंब असून चार दिवसात पूर्ण होतील. सदरील मोहीम दोन टप्प्यात चालणार आहे.  नागरिकांना असणाऱ्या विविध आजारांची माहिती घेऊन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे. 

यावेळी सरपंच सौ. विजया चव्हाण, उपसरपंच सौ. निमाबाई राठोड, ग्रा पं सदस्य लखन चव्हाण, सौ. चांगुणा चव्हाण ,सौ. ललिता चव्हाण, किसन राठोड, रेवाप्पा राठोड, शिवाजी राठोड, बाबू राठोड, रणजित चव्हाण, प्रेमदास राठोड, विजय राठोड, राहुल राठोड, नंदू पवार, सुनील जाधव, जयराम राठोड, आशा कार्यकर्ती बबिता राठोड आदीजण उपस्थित होते.

 
Top