नळदुर्ग : एस.के.गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील गुजनूर व परिसरातील वागदरी, शहापूर, गुळहळ्ळी, येडोळा आदी गावातील विधवा, भूमीहीन, वृध्द, निराधार महिलांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.

 त्रिरत्न बौद्ध माहासंघ भारत जिल्हा शाखा उस्मानाबाद, करूणा ट्रस्ट इंग्लंड, व बहुजन हिताय वसतिगृह उमरगा यांच्या वतीने गुजनूर ता.तुळजापूर येथे धान्य किट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी बहुजन वसतिगृहाचे अधिक्षक तथा धम्मचारी प्रज्ञाजीत ,धम्ममित्र शाख्यजीत कांबळे, धम्मसेवक हरीदास कांबळे , पत्रकार एस.के.गायकवाड, प्रा.जयभीम वाघमारे, आदींच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना व विधायक पंचशशील घेण्यात आले.याप्रसंगी बोलताना धम्मचारी प्रज्ञाजीत म्हनाले की,  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मानवी साखळी तोडणे अवश्यक असले तरी मानवतेची साखळी अखंड ठेवणे अत्यावश्यक आहे. तथागत गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा आदर्श समोर ठेवून धान्य किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी एस.के.गायकवाड यांचेही भाषण झाले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुजनूर, वागदरी, शहापूर, येडोळा, गुळहळ्ळी आदी गावातील गरजू महिलाना धान्य किटचे वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक  व आभार प्रदर्शन जयभीम वाघमारे यांनी केले.  यावेळी  शहाजी डावरे, वैभव वाघमारे, अनू लोंढे,श्रीकांत स्वामी, ज्ञानेश्वर वाघमारे, चंद्रकांत वाघमारे अनू लोंढे,अशा कार्यकर्ती प्रतिभा वाघमारे, रंजना वाघमारे, सि.अर.पी. सिंधूबाई माने,जयश्री वाघमारे,सह कार्यकर्ते महिला उपस्थित होते.

 
Top