नळदुर्ग : सुहास येडगे

 नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय चालू करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकीत्सक धनंजय पाटील यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करुन तुर्तास ४० खाट चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल असे म्हटले आहे, त्यामुळे आता नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय चालू करण्याच्या बाबतीत कोणताही आडथळा राहणार नाही. 

उस्मानाबाद जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता आणि तुळजापूर येथील कोरोना उपचार केंद्रातील खाटाची भासत असलेली कमतरता यामळे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय चालू करुन ग्रामीण भागातील नागरीकांना उपचार मिळावेत अशी मागणी अरोग्या मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानुसार राजेश टोपे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे येत्या २ ऑक्टोबर रोजी हे रुग्णालय चालू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. कारण हे उपजिल्हा रुग्णालय चालू होणे अत्यंत गरजेचे आहे, नळदुर्ग शहरासह अणदुर आणि जळकोट या मोठया गावांबरोबर जवळपास ५० गावच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे. 

सध्या कोरोनाचा शिरकाव मोठया प्रमाणात होत आसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकीत्सक धनंजय पाटील यांनी या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करुन तुर्तास चाळीस खाटाची व्यवस्था करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील या संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गपाट यांच्याशी चर्चा करुन त्या दृष्टीने इमारतीमध्ये तीन हॉल व कांही खोल्यांची निवड केली आहे. दरम्यान या खोल्यामध्ये तात्काळ लाईट फिटींग, प्लंबींगचे कामे, फर्शी आणि इतर कांही सुविधा तात्काळ करुन घेण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी वैदयकीय अधिक्षकांची नेमणुक झाली असली तरी इतर कांही रिक्त जागा, परिचारीका, नर्स यांच्या जागा भरण्यासाठी त्यांच्या पातळीवरुन वरीष्ठाकडून मंजूरी घेण्याचे काम करणार आसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय निदान कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांसाठी पहिल्या टप्पयात चालू करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी या ठिकाणी केवळ सध्या कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे रुग्णालय चालू करण्यात येणार आसल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय चालू होणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण या ठिकाणी दररोज पन्नास गावांच्या लोकांचा संपर्क येत असतो शिवाय या ठिकाणी रुग्णांची ही संख्या मोठी आहे, नळदुर्ग, अणदुर व जळकोट या तीन्ही शहरांची लोक संख्या पाहील्यास ५० हजाराच्या पुढे आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त असे रुगणालय चालू होणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक धनंजय पाटील हे आले आसता त्यांना शहर भाजपाच्या वतीने शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके आणि शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालय चालू करण्यात यावे यासाठी निवेदन ही दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे हे ही उपस्थीत होते.

येत्या 2 ऑक्टोबर रोजी नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय चालू करण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न होत असून तात्काळ वरीष्ठांशी संपर्क साधून तसा प्रस्ताव ही पाठविण्यात येणार आहे असे यावेळी धनंजय पाटील यांनी सांगितले.


 
Top