तुळजापूर : कुमार नाईकवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आयोजित सेवा सप्ताहाचे दि. 20 सप्टेंबर रोजी तुळजापुर विविध सामाजिक उपक्रमाने समारोप करण्यात आला.
समारोप कार्यक्रम प्रसंगी आमदार सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात तुळजापूर येथे नवनिर्मिती प्रेरणा महिला मंडळ सामाजिक संस्थाव व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी यांच्या वतीने दि. 20 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांसाठी खाऊचे वाटप, तसेच रुग्णायाला मास्क व सॅनिटायझर भेट देण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
श्री भवानी शंकर पेट्रोलियम येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क वाटप करुन सॅनिटायझर भेट दिले. त्याचबरोबर तुळजापूर येथील घर काम करणा-या पंचवीस महिलांचा मोफत युनायटेड इंडिया कंपनीचा कोरोना कवच विमा पन्नास हजार रुपयेचा काढण्यात आला. तसेच उद्योग समुहाच्या संस्थेच्या सर्व कामगार महिलांचा प्रत्येकी दोन लाख रुपये, तसेच गरीब महिलांना 25 हजार रुपयांचा मोफत कोरोना विमा कवच काढण्यात आला. तुळजापूरच्या खऱ्या अर्थाने स्वच्छता दुत असलेल्या भारतबाई देवकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथील डॉ. काळे, नदाफ, रोकडे, भाजपाचे सुहास साळुंके, गिरीष देवळालकर, सागर पारडे, नानासाहेब गरड, भांजी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनाताई सोमाजी, सचिव संध्या खुरुद, रूपाली घाडगे, लता सोमाजी, सुशमा मलबा, सर्वांची शिंदे, अपर्णा देवळालकर, उर्मिला महामुनी आदी उपस्थित होते.

