उस्मानाबाद, दि. 14 : नेहमीच समाज कार्यात सक्रिय असलेले व विद्युत मंडळातील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री नवनाथ अनुरथ काकडे यांची महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव अधिकारी कर्मचारी आघाडी पदी निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे सचिव डॉ. जे.पी. बघेल व जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे यांनी याबाबतचे नियुक्तीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी तसेच जिल्हाभरात संघटनेचा विस्तार करण्यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल प्रा. मनोज डोलारे, प्रा. अमोल गुड्ड, गणेश एडके सर, सुनिल बुटे सर व प्रा. सोमनाथ लांडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.