काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलच्या वतीने तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी सारिका काळे यांना क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी क्रीडा मार्गदर्शक इसाक पटेल सर यांना राज्य स्तरीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार व अनिल धोत्रे सर यांना राज्य स्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेशराव जळके यांनी क्रीडापटू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णा कोल्हटकर, अनिल घुगे, बिलकुलेर, खंडू काळे, रमेश पवार, रोहित म्हेत्रे आदीजण उपस्थित होते. शेवटी गणेश जळके यांनी आभार मानले.