मुरुम, दि. 04 : मुरुम पो.ठा. चे पथक दि. 04.09.2020 रोजी पहाटे 04.30 वा. सु. रात्रगस्त करत होते. यावेळी मुरुम- अक्कलकोट रस्त्यावरील कंटेकुर मोड येथे अनिल पांडुरंग कांबळे उर्फ अमोल, रा. चुंगी, ता. अक्कलकोट हा मो.सा. क्र. एम.एच. 13 एबी 3937 वरुन पोते वाहुन नेत असलेला दिसला. पोलीसांना पाहुन तो मोटारसायकल व पोते जागेवर सोडून अंधारात पसार झाला. पोलीसांना त्या पोत्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु असा 31,200/-रु. चा माल आढळला. अशा प्रकारे अनिल कांबळे याने प्रतिबंधीत पदार्थ बाळगुन मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोना- अमर महानुरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top