तामलवाडी : तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,तथा ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांची दि.२८ रोजी  शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

     शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २८ वर्षापासून संस्थापक अध्यक्षाची धुरा सांभाळत सतत सामाजिक कार्य कार्यात सहभागी असणारे व तुळजापुर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून सार्वजनिक शिवजन्मोत्सव घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे तसेच शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान,वृक्षारोपण,विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,गरीब महीलांना साड्या वाटप,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,असे अनेक उपक्रम राबवणारे तसेच मराठा समाजबांधवासाठी सतत कार्यरत असणारे शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची दि.२८ रोजी शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेवक समितीचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यानी निवडीचे पत्र देऊन सर्जेराव गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या आहेत.जनतेच्या हितासाठी विद्यार्थी ,शेतकरी,महीला ,कामगार,उद्योजक यांच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षण,शिक्षण,नोकरी,उद्योग- व्यवसाय,शेतीच्या जनजागृतीसाठी व राजकीय,शासकीय,निमशासकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या अन्याय अत्याचाराविरूध्द ही चळवळ उभारण्यात आली असुन या शिवसेवक समीतीच्या माध्यमातून चांगले शिवकार्य करू असे शिवसेवक समीतीचे नुतन जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी बोलताना सांगितले आहे.

     या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असुन  शिवसेना गणप्रमुख दत्तात्रय गवळी,सुधिर पाटील,शिवाजी सावंत,समाधान गायकवाड, योगेश निकम,शिवाजी पाटील,इंद्रजित घोटकर,तुकाराम गायकवाड,सोपान सावंत,नागेश घोटकर,कृष्णा घोटकर,निरंजन करंडे,निलेश चिवरे,दादा पाटील,संपत पाटील,दत्तात्रय जगताप,ज्ञानेश्वर जगताप,सचिन शिंदे,नागेश शिंदे,शशिकांत गायकवाड, यानी सर्जेराव गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top