तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील युवा उद्योजक ज्ञानेश्वर जगताप यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन तामलवाडी आरोग्य उपकेंद्रास एच.बी मशीन भेट देण्यात आले आहे.
तामलवाडी येथील आरोग्य उपकेंद्र येथे एच.बी.मशीनची कमतरता असल्याची माहीती मिळताच तामलवाडी येथील युवा उद्योजक ज्ञानेश्वर जगताप यानी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कोरीनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता त्यानी स्वखर्चाने आरोग्य उपकेंद्रास एच.बी मशीन भेट दिली.आरोग्य सेविका संगीता चव्हाण यानी ती मशीन स्वीकारून जगताप याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
याप्रसंगी आरोग्य सेविका संगीता चव्हाण,हुजेफा शेख,सिध्देश्वर मसुते,सुधीर पाटील,मारूती रोकडे,प्रशांत राऊत,कृष्णा घोटकर,ज्ञानेश्वर माळी,रौफ सय्यद आदी उपस्थित होते.
