तुळजापुर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने मंदिराशी निगडीत असणाऱ्या  सर्व पुजारी वर्ग, सेवेकरी, व्यापारी यातील गरजु कुटुबांना अल्प व्याजदरात अर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे एक लेखी निवेदन दि.23 रोजी  तुळजापुर शहरातील युवकांनी जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदीर हे कोरोना संसर्गजन्य  कोरोना रोगामुळे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून ते आजतागायत बंद आहे.

त्यामुळे मंदीरावर अवलंबून असणारे पुजारीवर्ग,  छोटे मोठे, व्यापारी, सेवेकरी यातील अत्यंत गरजू असलेल्या कुंटुबातील प्रमुख व्यक्तींना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर कडून अल्प व्याजदरात अर्थिक मदत म्हणून प्रत्येकी कुटुंबाला १०,००० रू मदत करावी, तसेच हि रक्कम कायमस्वरूपी नसून परतफेड या तत्वावर करावी, जेणे करून मंदीराचेही नुकसान होणार नाही. याबाबतीत संस्थान अध्यक्ष या नात्याने काही अटी शर्तीवर नियमावली तयार करून तसेच  मंदीर सस्थानला आदेश द्यावे व गरजूवंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर येथील युवक सुमित कदम, सागर कदम, किरण कदम, शुभम कदम यांच्यासह शहरातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top