जळकोट : मेघराज किलजे
मानमोडी (ता. तुळजापूर) येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक रमेश गुणवंत दुधभाते यांना शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, राज्य शाखेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यात याच बरोबर कोव्हिड-१९ महामारीच्या काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष काशिनाथ भालके ,मराठवाडा सरचिटणीस शशिकांत डांगे, जिल्हा नेते प्रवीण ठाकुर, संजय भोसले, मुडमे अनिल, संजय खंडाळकर, वर्षाराणी खंडाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारीचा वाढता प्रभाव पाहून व प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत दुधभाते परिवाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश दूधभाते यांचे शाळा व्यवस्थापन समिती, विविध शिक्षक संघटना, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, ग्रामपंचायत कार्यालय , शालेय विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.