उस्मानाबाद, दि. 10 :  उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेतील थकीत रक्कम देताना चेअरमन, राजकीय पुढारी यांच्या शिफारशी  बंद करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन प्रहार अपंग संघटनेच्या वतीने  उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  देण्यात आले.

येथील बँकांच्या खातेदारांच्या थकीत रक्कमा चेअरमन,राजकीय पुढारी यांच्या  शिफारशीवून दिल्या जातात. सामान्य खातेदारांना दोन हजार ते पाच हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते .तर चेअरमन,राजकीय पुढारी यांच्या शिफारसिवरील खातेदारांना लाखापर्यंत रक्कम दिली जाते.जिल्ह्यातील खातेदार आपले शेतीची कामे सोडून सुमारे 100 किमीचा प्रवास करत बँकेत येतात.परंतु त्यांना दोन हजार ते पाच हजार रुपये एवढीच रक्कम देऊन माघारी पाठवले जाते.यासाठी खातेदारांना बँकेत सतत हेलपाटे मारण्यास लागतात.यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी चेअरमन,राजकीय पुढारी यांच्या  शिफारशी तात्काळ बंद करण्यात याव्यात आणि खातेदारांना आपल्या स्तरावून योग्य न्याय द्यावा अन्यथा  बँकेस टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनावर प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,उपाध्यक्ष महेश माळी,महादेव चोपदार,रवी माळी गणेश माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top