नळदुर्ग, दि. 10 : पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. त्यानुसार तुळजापुर तालुक्यातील मुदत संपणा-या 53 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची यादी सध्या सोशल व्हायरल होत आहे. मात्र ऐनवेळी या यादीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तुळजापुर तालुक्यात मुदत संपणा-या ग्रामंपचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणा-या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे :-
तुळजापूर तालुक्यातील बारुळ, वाणेगाव, किलज, जवळगा मे, सिंदफळ या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी (पं.) एस.एस. राऊत, तर अमृतवाडी, वडगाव काटी, तामलवाडी, दहिवडी, तिर्थ खु ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी (पं.) आर.ए. वैरागे, तर गंधोरा, सिंदगाव, हंगरगा नळ, धनेगाव, बसवंतवाडी ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी (पं.) के.बी. भांगे, तर इटकळ, फुलवाडी, खानापूर, कदमवाडी ग्रामपंचायतीवर वि.अ. (कृर्षी) डी.एस. नडगिरे, तर कुंभारी, गोंधळवाडी, रायखेल, भातंब्री ग्रामपंचायतीवर वि.अ. (सां.) एस.एम. लोमटे, तर देवकुरळी, पिंपळा खु, सुरतगाव, आरळी खु ग्रामपंचायतीवर वि.अ. (कृर्षी) एन.जी. कुलकर्णी, तर सराटी ग्रा.पं. वर वि.अ. (उमेद) डी.टी. साळुंके, शहापूर ग्रा.पं. वर वि.अ. दिलीप नडगिरे, येवती व बाभळगाव ग्रा.पं. वर वि.अ. (उमेद) डी.टी. साळुंके, तर काळेगाव, जळकोट, जळकोटवाडी नळ, हगलूर ग्रा.पं. वर वि.अ. (कृर्षी) एस.बी. तांबोळी, कात्री, खडकी/शिवाजीनगर, सलगरा दिवटी ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) बी.के. बन, तर दिंडेगाव/टेलनगर व हिप्परगा ताड ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) टी.एम. माळी, नांदुरी, कसई, मंगरुळ ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) एस.ई. माने, तर पिंपळा बु, शिराढोण, वडगाव देव ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) एम.एस. काळे, धनगरवाडी व बोरगाव ग्रामपंचायतीवर वि.अ. (शिक्षण) जी.एम. सर्जे, तर चिंचोली व सरडेवाडी ग्रा.पं. वर वि.अ. (शिक्षण) एस.एम. राऊत, अणदूर ग्रामपंचायतीवर शा.अ. चे ए.आर. खान, तर आरळी बु व बिजनवाडी ग्रामपंचायतीवर वि.अ. (शिक्षण) वाय.के. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.