तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणारे उपक्रमशिल शिक्षक विठ्ठल नरवडे यांना एकता फांऊडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     समाजातील भावी पीढीवर उत्तम संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात.आजवरती अनेक सुजाण नागरीक समाजाला देण्याचे महान कार्य शिक्षकांच्या माध्यमातून झाले आहे.यामागे शिक्षकांचे योगदान प्रशंसनिय आहे.अशीच भावी पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व पिंपळा खुर्द येथील  शाळेमध्ये नवनविन उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी वाटणारे उपक्रमशिल शिक्षक विठ्ठल नरवडे याना धाराशिव येथील एकता फांऊडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणार्या शिक्षकांचा गौरव व्हावा तसेच सुसंस्कृत पिढी घडवण्याचा शिक्षकांचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू रहावा व या प्रयत्नाला बळ मिळावे या उद्देशाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून एकता फांऊडेशन धाराशिव यांच्या वतीने नरवडे यांच्यासह १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील उपक्रमशिल शिक्षक विठ्ठल नरवडे याना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने तामलवाडी पंचक्रोशीतील सर्व मित्र परीवार तसेच पिंपळा खुर्द येथील पालक तसेच ग्रामस्थांमधुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्यार्थी घडवत असताना गावातील ग्रामस्थांनी दिलेली लाखमोलाची साथ यामुळेच मला विद्यार्थ्यां घडवण्यास उर्जा मिळते व सर्वांच्या आशिर्वादामुळेच हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे आदर्श शिक्षक विठ्ठल नरवडे यानी तुळजापुर लाईवशी बोलताना सांगितले आहे.

 
Top