तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे सचिव तथा विश्वहिंदु परिषदचे प्रा. काकासाहेब शिंदे यांचे मंगळवार दि. ८ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 9 रोजी श्री तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने व समस्त तुळजापुर शहरवासियांनी तसेच विविध क्षेञातील मान्यवर व पञकार बांधवानी स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपुर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली.

यावेळी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, कोषाध्यक्ष किरण क्षिरसागर, सहसचिव नागेश सांळुके, संचालक प्रा. धनजंय लोंढे, लालासाहेब मगर, विकास खपले, अविनाश गंगणे, सुधीर रोचकरी, भारत कदम, सचिन कदम, शिवाजी बोधले, प्रा. संभाजी भोसले, पञकार सतिश महामुनी, जगदीश कुलकर्णी, श्रीकांत कदम, प्रा. रमेश नन्नवरे, सुरेश दिक्षीत, दताञय धुमाळ, इंद्रजीत सांळुके, गणेश सांळुके, नारायण भोसले, बाळासाहेब श्यामराज, महेश धुमाळ, जिवन इंगळे, बापु परदेशी, महेश गवळी, आण्णासाहेब क्षिरसागर, योगेश रोचकरी, कुमार टोले, सचिन अमृतराव, अक्षय जाधव, बंटी पोतदार आदीसह पुजारी बांधव राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 
Top