तुळजापूर, दि. 22 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त व सामजिक बांधिलकी म्हणून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य शिबीर, महिला गुणगौरव सोहळा व बेरोजगारीचा मेळावा उस्मानाबाद जिल्हा रिपाइंच्यावतीने संपन्न झाला.
सदरील कार्यक्रम हा रोजगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष संजय शितोळे यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी रोजगार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा काळे, उत्तम भालेराव, सम्राट ग्रुपचे अध्यक्ष पप्पू सुरवसे, अमोल देशमुख, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव भोसले, उस्मानाबद तालुकाध्यक्ष नवनाथ हुंबे, शहर उपाध्यक्ष शरद बनसोडे, रणजित रोकडे, आकश मस्के, यशपाल शिरसाट, समाधान धकतोडे, ज्ञानेश्वर पांडागळे, दत्ता साखरे, दयानंद सरवदे, योगेश बनसोडे, विष्णु सोनवणे, इंद्रजित जाधव यांच्यासह रोजगार आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
