तामलवाडी, दि. 06 : शिवमुर्ती शिंदे, रा. पिंपळा (खुर्द), ता. तुळजापूर यांनी अमोल काळे, रा. सुरतगांव यांना पैसे उधार दिले होते. त्या उधार थकबाकीची मागणी ते अमोल काळे यांना वेळोवेळी करत असल्याचा राग अमोल काळे यास होता. दि. 06.09.2020 रोजी 08.00 वा. सु. 1) अमोल काळे 2) जांबुवंत काळे 3) रंजना काळे 4) सारिका काळे 5) शरम काळे या पाच जणांनी शिवमुर्ती शिंदे यांच्या अंगणात येउन, “मला उधारीचे पैसे मागता का, तुला ते देणार नाही.” असे धमकावून शिवमुर्ती शिंदे यांसह पत्नी- छायाबाई, मुलगा- कुमार यांना कुऱ्हाड, काठीने मारहाण केल्याने ते सर्व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या कुमार शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 323, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग, दि. 06 : रंगनाथ अनंतराव देशमुख, रा. लोहगांव, ता. तुळजापूर हे दि. 15.08.2020 रोजी 15.00 वा. सु. गावातील आपल्या शेतात पिकाची काढणी करत होते. यावेळी गावकरी- 1) संजय मारेकर 2) सविता मारेकर 3) ओम मारेकर अशा तीघांनी शेतजमीनीच्या मालकीहक्काच्या कारणावरुन रंगनाथ देशमुख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रंगनाथ देशमुख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 05.09.2020 रोजी नोंदवला आहे.
