उस्मानाबाद, दि. 11 : मागील आठवड्यात वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच खरीप पिके असलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदीं पिकांचेही खूप नुकसान झाल्याने त्याचीही नुकसान भरपाई मिळावी, याबाबत आज शुकवारी झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील  यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात रीतसर ठराव शासनास आजच्या सर्वसाधारण सभेत पाठविण्यात आला आहे. 

त्याचबरोबर शुक्रवारी मंञालयातील संबंधित खात्याच्या अधिका-यांची जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा यांनी केली. तसेच पाटील यांनी शाळा सुरू करण्याबातचा विषयावर चर्चा केली. यावेळी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शासनाचे परिपञक नसल्यामुळे  9 वी 10 वी 12 वी वर्गासाठी अदयाप तरी निर्णय नाही, असे यावेळी शिक्षणाधिकारी यांनी यावेळी सांगितले.


 
Top